मार्क्सवादाच्या पायावर समाजाची पुनर्रचना करणे भगतसिंगाचे स्वप्न- कॉ. हिवराज उके
अध्यक्षस्थानी भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके होते. तर ओबीसी जनगणना परिषदेचे अध्यक्ष कॉम्रेड सदानंद इलमे, महिला फफेडरेशनच्या नेत्या कॉम्रेड प्रियकला मेश्राम, कॉम्रेड वामनराव चांदेवार व कॉम्रेड भगवान मेश्राम यांचे भगतसिंगाच्या स्वप्नातील भारत काळाची गरज या विषयानुसंगाने मार्गदर्शन झाले. अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड हिवराज उके यांनी आज २३ मार्च शहीद दिन पासून ते १४ एप्रिल २०२५ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्यंत भाकपने राष्ट्रव्यापी राजकीय मोहीम राबवून समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, आणि समानता या आपल्या प्रजासत्ताकाच्या मूलभूत तत्त्वावर होत असलेला हल्ला, सत्तेचे केंद्रीकरण, संघराज्याचा ऱ्हास आणि वाढती महागाई, बेरोजगारीर, गरिबी, असमानता, मुलींवर व महिलांवरील अन्याय अत्याचार तसेच केंद्र व राज्य सरकारचे जनविरोधी धोरण ज्यात- महाराष्ट्र सरकारने आणलेले संविधान विरोधी, जनविरोधी विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभा २०२४, क्रमांक ३३ चा समावेश असून या सर्वांचा विरोध वत्यासाठी जनजागरण करण्याचे आवाहन केले.
संचालन ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड रवी बावणे यांनी केले तर आभार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड गजानन पाचे यांनी मानले. याप्रसंगी नागरिक, विद्यार्थी युवक, महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. त्यात प्रामुख्याने कॉम्रेड ताराचंद देशमुख, गौतम भोयर, महानंदा गजभिये, शितल नागदेवे, उर्मिला वासनिक,विश्वजीत बनकर, प्रणय बडवाईक, सायली झंजाडे, खुशी गजभिये, स्मिकल लोणारे, सरस्वत्ता देशमुख, सौरभ देशमुख, भागीरथा निपाणे, झेबा सैय्यद, लक्ष्मी सकतेल, रामराव रामटेके प्रताप डोंगरे, जयदेव सोनकुसरे, राजू लांजेवार, हरिदास जांगडे इत्यादींची उपस्थिती होती.