भंडारा पोलीस कम्युनिटी लीग क्रिकेट स्पर्धा
या स्पर्धेचा मुख्य उद्देश “स्ट्रिकींर्ग फ्रेन्डसशिप कॅचिंग क्राईम’ हे असुन समाजातील सर्व जाती धर्मामध्ये एकोपा ठेवण्याचा आहे. पोलीस आणि नागरिकांमधील संबंध सुधारणे आणि त्यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करणे हा आहे. या स्पर्धेमुळे पोलीस आणि नागरिक एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतील व नागरिकांमध्ये एकता आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होवून भंडारा जिल्हयामध्ये शांतता निर्माण होईल असे भंडारा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी सांगितले. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध सुधारण्यासाठीआणि त्यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. भंडारा पोलीसांच्या वतीने भंडारा जिल्हयामध्ये कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत भंडारा पोलीस कम्युनिटी लीग आयोजीत केली आहे.
या स्पर्धे मध्ये सर्व नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. भंडारा जिल्हयातील सर्व जातीमध्ये, सर्व समाजामध्ये एकोपा नांदावा शांतता राहावी व भंडारा जिल्हयाच्या पोलीस उद्घोष “बॅट फॉर ब्रदरहूड ॲण्ड बॉल फॉर बाँडिंग’याचे यशस्वितेसाठी ही स्पर्धा आयोजीत केली आहे. तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग नोंदवुन भंडारा जिल्हयात शांतता प्रस्थापित करण्यासाठी या नाविण्यपूर्ण उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधिक्षक श्री नूरुल हसन यांनी केले आहे.