वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या स्वावलंबी कल्याणकारी समितीची पूर्व विदर्भ बैठक संपन्न
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या स्वावलंबी कल्याणकारी समितीची पूर्व विदर्भ चे बैठक १९ मार्च २०२५ दिवस बुधवार वेळ बारा वाजता भंडारा जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, तसेच राज्य संघटनेचे पूर्व विदर्भातील पदाधिकारी दिनेश ऊके, विनोद पन्नासे, मनीष वासनिक, अमोल तितरमारे, राकेश आकरे, राजू गवारे, पंकज कोहळे, संजय थोटे, राजेश वैद्य, संजय बदलकर, विजय निर्वाण उपस्थित होते. यावेळी पूर्व विदर्भ समितीचे प्रमुख सुनील पाटणकर यांनी समितीचे कामकाजाबाबत व निधी उभारण्याबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी सर्व पूर्व विदर्भातील पदाधिकारी यांनी मोलाच्या मार्गदर्शन केला. भंडारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना चे अध्यक्ष किशोर मोरे यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांच्या सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन अंगपाल पारधी, आभार अरविंद शेंडे यांनी केले. भंडारा येथील वृत्तपत्रचे आऊजा डोंगरे, चंदू लिमजे, पंकेश भोले, ईश्वर धकाते, कंकर अटराये, कुशल कावळे, राजू डोरले, राजू गौरी, प्रफुल्ल देशभर तार, योगेश भुरे, नरेंद्र गौरी, रुपेश नंदनवार, चेतन पराते, चंद्रकुमार रेवतकर, हितेश निनावे, मिलिंद बोंगिरवार, प्रभाकर लिमजे, गणेश कुरंजकर, सुरेश चांदेवार, आदींची उपस्थिती होती. तसेच भंडारा जिल्ह्यातून तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, अड्याळ, पवनी येथील वृत्तपत्र विक्रेत्यांची यांची उपस्थिती होती. तसेच भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी सदिच्छा भेट दिली.