फेब्रुवारी २०२५ ची गुन्हे आढावा बैठक करडी येथे संपन्न
या गुन्हे बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वरकातकडे तसेच जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि सर्व शाखा प्रमुख उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदारांपैकी फेब्रुवारी/२०२४ मधे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३१ पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस पाटील तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांना तसेच पोलीस दलास मदत करणाऱ्या नरसिंहटोलाचे पोलीस पाटील रामदास होकटु बोंद्रे, चिचखेडायेथील पोलीस पाटील अर्चना संतोष श्रीरामे यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशंसापत्र देवून सत्कार करण्यात आला.
बैठकीमधे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडुन प्रलंबित गुन्हयांची माहीती घेवुन तपासासंबंधाने मार्गदर्शन करण्यात येवुन जिल्हयात लपुन छपुन सुरु असलेले सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रमुखांना आदेश देण्यात आले. गुन्हे आढावा बैठकीमधे बिजु गंवारे, सचिव, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण भंडारा यांचे कडुन नविन फौजदारी कायदयाचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना नविन कायदयासंबंधाने मार्गदर्शन केले त्याकरीता पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी बिजु गंवारे, यांचे विशेष आभार व्यक्त केले. गुन्हे आढावा बैठकीनंतर पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी करडी परीसरातील जनतेशी त्याच मंगल सभागृहामधे प्रत्यक्ष संवाद साधुन त्यांच्या अडी अडचणी जाणुन निराकरण केलेले आहे.