नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या- आ. डॉ. परिणय फुके

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः-मुंबईत सुरु असलेल्या विधिमंडळाच्या विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा गाजत आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा रंगली असतानाच, आमदार डॉ. परिणय फुके यांनी दरवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळेशेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्यामुळे फळबागा, भाजीपाला आणि धान्य पिके उद्ध्वस्त झाली आहेत. डॉ. परिणय फुके यांनी सभागृहात बोलताना स्पष्ट केले की, राज्यातील शेतकरी आधीच विविध समस्यांनी ग्रस्त असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्य शासनाने या नुकसानीबाबत त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी निकष अधिक लवचिक करणे आवश्यक आहे. त्यांनी सरकारकडे मागणी केली की, पिकांचे पंचनामे करून त्वरित मदतीसाठी निधी जाहीर करण्यात यावा. आदेश जाहीर होतो, पण निधी वेळेवर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवते, असे सांगत त्यांनी प्रक्रियेला गती देण्याची गरज व्यक्त केली. सरकारचा हा निर्णय निश्चितच दिलासादायक असला तरी प्रत्यक्षात निधी किती लवकर वितरित होतो, हे पाहणे महत्वाचेठरणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल, मात्र प्रत्यक्ष निधी वितरण किती लवकर होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राज्यभरातील शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता, मदत वेळेवर मिळणे अत्यावश्यक आहे, असेही डॉ. फुके यांनी लक्षात आणून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *