जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा
कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थितांना ग्राहक हिताच्या दृष्टीने शाश्वत जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “उपभोगावर नियंत्रण ठेवत ग्राहकांचे हित जपण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे.’ या विशेष कार्यक्रमाद्वारे ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी ग्राहकांच्या सशक्तीकरणावर भर देत, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे जागतिक ग्राहकादिना निमीत्त या वर्षी अ र्गीीीं ढीरपीळींळेप ींे र्ीीीींरळपरलश्रश श्रळषशीींूश्रशी या संकल्पनेवर आधारित पथनाटय चमु तसेच विविध विभागांमार्फत लावण्यात आलेल्या प्रदर्शनीचे मान्यवरांच्या कडुन पाहणी करण्यात आली. व ग्राहक जन जागृतीबाबत प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते यांनी शाश्वत जीवन शैलीकडे एक न्याय्य संक्रमण याबाबत सविस्तर व विस्तृत मार्गदर्शन केले.
जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी शाश्वत जिवनशैलीकडे न्याय्य संक्रमण करण्याकरिता शासनाच्या विविध योजना कार्यान्वित असुन पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या यशाचा संदर्भ देवुन मानवी विकासा सोबत पर्यावरणाचा समतोल ढासळणार नाही या करीता विदयार्थ्यांना तसेच उपस्थितांना संबोधित केले तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेने ठरवुन दिलेल्या शाश्वत विकासाची माहिती देतांना १७ उद्दिष्टा बाबत विवेचन केले. निसर्गामध्ये उपलब्ध संसाधनाचा जपुन वापर करुन पुढील पिढीसाठी संसाधन उपलब्ध राहतील या दृष्टीने दक्षता घेण्याबाबत आव्हान केले भारताने ज्या प्रमाणे अन्नधान्यांच्या टंचाईवर हरितक्रांतीव्दारे मात केली त्या प्रमाणे हरित उर्जेचा वापर करुन उर्जा क्षेत्रात ग्रीन फ्युएलचा वापर करुन दुसरी हरीत क्रांती आणता येईल असे प्रतिपादन केले सतीश आनंदराव सप्रे अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, भंडारा व पराग मोरेश्वर सुभेदार सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग भंडारा तसेच जयश्री गोपनारायण सदस्या, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग,
भंडारा यांनी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहकांचे हक्क याविषयी माहिती दिली. तसेच डॉ. अनिता महाजन यांनी ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजन करण्याची आवश्यकता असल्याचे सुचित केले व प्रेमराज मोहोकार यांनी शाश्वत जिवनशैलीबाबत समर्पक शब्दात मार्गदर्शन केले कार्यक्रमाला जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेचे अशासकिय सदस्य रविंद्र तायडे व संजय आयलवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपीका अन्नपुर्णे यांनी तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुहास टोंग खरेदी अधिकारी जिल्हा पुरवठा कार्यालय भंडारा यांनी केले.