
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- खुलताबाद येथील औरंग्याची कबर हटविण्यात यावे या मागणीचे निवेदन भंडारा जिल्हा वि. ही. प. परिवारातर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले. यावेळी विदर्भ प्रांत मातृशक्ति संयोजिका कंचनताई ठाकरे, विभाग संयोजिका दीपाताई नायर, जिल्हा सहमंत्री प्रकाश पांडे, नगर अध्यक्ष मनोहर हेडाऊ, श्रीराम शोभायात्रा समिती अध्यक्ष मयूर बिसेन, जिल्हा समरसता प्रमुख गजानन मेहर, अनिल डोंगरवार, करमसीभाई पटेल, जिल्हा सह संयोजक बजरंग दल मनीष बिचवे, प्रीतिताई जांभूलकर, राहुल खरात, अविनाश नारनवरे, प्रदीप ढबाले, विकास मदनकर, बालू जरकारिया, सुखदेव वंजारी उपस्थित होते.