
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दिनांक १६ मार्च २०२५ रोजी अखंड भारताचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जन्मोत्सव (तिथीनुसार) निमित्त मागील वर्षी प्रमाणे छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान, भंडारा तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्री हनुमान मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, शुक्रवारी, भंडारा येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद देत तब्बल २५ तरुण व तरुणींनी शिवशंभूच्या मावळ्यांनी रक्तदान केले.