पदवीधर महासंघाच्या मागण्या मान्य, उपोषण स्थगित
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणी, केंद्र प्रमुख पदोन्नती व माध्यमिक विभागातील पदोन्नती या मागण्या मान्य होण्यासाठी पदवीधर महासंघाच्या नेतृत्वात सर्व पदवीधर शिक्षक दि. १७ मार्चपासून साखळी उपोषण करणार होते. नरेशभाऊ ईश्वरकर शिक्षण सभापती यांच्या उपस्थितीत, रविंद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी पदवीधर शिक्षकांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे लिखित आश्वासन संघटनेला दिले. पदवीधर महासंघाने या आश्वासनानंतर जिल्हा अध्यक्ष युवराज वंजारी यांनी साखळी उपोषण मागे घेण्यात आल्याचे घोषित केले. शिक्षण सभापती व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी पदवीधर महासंघाचे राज्य प्रतिनिधी प्रमोद घमे, मुकुंद ठवकर, भिमराव मेश्राम, कैलास बुध्दे, भारत मेश्राम, किशोर मेनपाले, विवेक हजारे, दुर्गाप्रसाद शेंडे, गणेश शेंडे, श्रीकृष्ण हाडगे, भूषण हुमणे, निलेश शामकुवर, संदेश देवकते, दिनेश शिवणकर, शंकर बावणकर, दिनेश सार्वे, कल्पेश झलके, बाळू खराबे, पुरुसोत्तम बोपचे, स्मिता पात्रिकर, दीपा गोबाडे रूपेश नागलवाडे व संघटनेचे पदवीधर शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.