कोल्हापुर गोंदिया महाराष्ट्र मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेसला नियोजित वेळेवर गोंदिया प्लॅटफॉर्मवर आणावे……..
त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचण्यास बराच वेळ होतो. या दोन्ही ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म सुद्धा वेगळा आहे असे असल्यावर रेल्वे प्रशासनाने जाणून-बुजून या दोन्ही ट्रेनला थांबविल्याचे निदर्शनास येते. वारंवार निवेदन देऊन सुद्धा रेल्वे प्रशासनाची बाजू ऐकून न घेणारे निगरगट्ट रेल्वे प्रशासनाला आज समज देण्यात आली. त्याचप्रमाणे उत्तरेकडील म्हणजेच रेलटोली बाजूला स्वयंचलित सीडी बरेचदा बंद असते तसेच या बाजूला टू व्हीलर पार्किंग साठी शेड आणि बेसमेंटची व्यवस्था नाही.अशा अन्य समस्यांना घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वराडे यांच्या नेतृत्वात गोंदिया रेल्वे स्टेशन प्रबंधक एम के रॉय यांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्यामार्फत माननीय मंडल रेल प्रबंधक दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर यांना निवेदन पाठविण्यात आले.
गोंदिया आणि परिसरातील प्रवाशांना वेठीस धरणारे रेल्वे प्रशासनाने वेळीच या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली नाही तर मात्र येत्या काळात महाराष्ट्र आणि विदर्भ एक्सप्रेसच्या नियोजित आगमनामध्ये दिरंगाई केली तर आंदोलन करण्याची सुद्धा तयारी असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे प्रशासनाविरुद्ध आंदोलन केल्या गेल्यास त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीत रेल्वे प्रशासन जबाबदार राहील असे सुद्धा कळविण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर वराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पप्पू पटले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजीव ठकरेले,एस.बी. गुप्ता, चंद्रकांत मदनकर, राजूभाऊ गोंधळे, कृष्णा कठाणे, अमर राहुल, देवचंद बिसेन, मनीष चव्हाण, मंथन नंदेश्वर, ईश्वर सहारे,राकेश पाटील, प्रवीण भुजाडे आणि इतर उपस्थित होते.