बचत गटांनी बँकेची कर्जपरतफेड नियमीत करावी-संजय बरडे
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बरडे, प्रमुख अतिथी म्हणुन बँकेचे माजी संचालक डॉ. प्रकाश मालगावे, बँकेचे संचालक नरेद्र बुरडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक देवेंद्र हेडाऊ व मुख्याधिकारी ज्योती गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. प्रकाश मालगावे यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले कि, आज महीला या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांपेक्षा कशा वरचढ ठरत आहे हे उदाहरण देवुन सांगितले. तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे केवळ स्त्रीशक्तीच कारणीभुत असते, यांचेही विवेचन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बरडे यांनी, बचत गटांनी बँकेकडुन कर्ज घेवुन गटांतील सदस्यांचा व त्यांच्या कुंटुंबाचा कसा विकास करता येईल, हे विषद केले व बचत गटांनी बँकेची कर्ज परतफेड करण्यास कुचराई करु नये असेही आवाहन यावेळी केले. प्रास्ताविक भाषणात नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक देवेंद्र हेडाऊ यांनी, नाबार्ड महीलांच्या उत्थानाकरीता व त्यांना प्रगतीच्या वाटेवर आणण्याकरीता कसे प्रयत्नशील आहे हे सांगीतले व महीलांकरीता नाबार्डद्वारे असलेल्या विविध योजनांची माहीती दिली. यावेळी ज्योती गुप्ता, उत्तम मेश्राम व संजय पदवाड यांची समयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन वैशाली नागदेवे यांनी तर आभार प्रदर्शन ज्योती गुप्ता यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.