गोंदिया शहर पोलिसांनी केली अतिक्रमणावर कारवाई….
ही बाब लक्षात घेऊन गोंदिया शहर पोलिसांनी कारवाई करत फूटपाथवर दुकाने थाटणाऱ्या दुकानदारांना जागेवरच चालान बजावले. यापुढे कोणत्याही दुकानदाराने रस्त्यावर किंवा फूटपाथवर अतिक्रमण केल्याचे आढळून आल्यास त्यादुकानदारांना पोलिसांनी जारी केलेल्या चालाननुसार आता गोंदिया न्यायालयात जाऊन विहित दंड भरावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. भविष्यात पुन्हा अतिक्रमण करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या कारवाईनंतर गोंदिया नगरपरिषदेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अतिक्रमण काढणे ही नगरपरिषदेची जबाबदारी असूनही नगरपरिषद याकडे लक्ष देत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे आता पोलीस विभागाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. नगर परिषदेने यापूवर्ी कारवाई केली असती तर एवढी समस्या उद्भवली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आता अतिक्रमण काढण्याची जबाबदारी पोलिसांना घ्यावी लागत असल्याने कारवाईनंतर नगर परिषदेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर बाजारपेठ परिसरातील दुकानदारांमध्ये घबराट पसरली आहे. अनेक दुकानदारांनी तात्काळ आपली दुकाने हटवून आपल्या हद्दीत बंद करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी काही दुकानदारांनी याला पोलिसांचा कडकपणा असल्याचे सांगत नगर परिषदेवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.