भंडारा जिल्हा देखरेख संघाच्या उपाध्यक्षपदी होमराज कापगते अविरोध
जर काही ठिकाणी अनियमितता निर्माण झाली तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी भंडारा जिल्हा देखरेखसंघाची आहे. जिल्हा देखरेख संघाची निवडणूक मागीलवेळीसुद्धा बिनविरोध झाली. यावेळीही काहींनी अर्ज दाखल केले होते. परंतु सर्व तालुक्यातील संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी शब्दाचा मान राखत निवडणूक बिनविरोध घेण्याचा निर्णय घेतला. सुनील फुंडे यांनी पुढे नमूद केले की, भंडारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष असल्याने, मी देखरेख संघाचा पदसिद्ध अध्यक्ष आहे.
जिल्हा देखरेख संघात संचालकांपैकी एक उपाध्यक्ष राहतो. त्यानुसार होमराज कापगते हे दुसक्तयांदा भंडारा जिल्हा देखरेख संघाचे उपाध्यक्ष झाले. सेवा सहकारी संस्था मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका राहिल. सर्व सहकारी संस्थांकडून पीक कर्ज, ट्रॅक्टर कर्ज आणि आधुनिक उपकरणे खरेदीसाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज दिले जाईल. जिल्हा देखरेख संघ अधिक मजबूत व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सेवा सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती बदलण्यासाठी काम करत आहे. या माध्यमातून भंडारा जिल्हा देखरेख संघाला चांगले दिवस येतील. सध्या ३६४ संस्थांसाठी ३६ कर्मचारी काम पाहत आहेत, असेही सुनील फुंडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल्हा देखरेख संघाचे नवनियुक्त संचालक उपस्थित होते.