शिवसेना (उबाठा) का जिलाधिकारी कार्यालयवर शेतकरी आक्रोश मोर्चा

जिलाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन सादर

दै. लोकजन वृत्तसेवाभंडारा:- राज्याच्या महायुती सरकारने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षांच्या २०२५-२६ बोनसबाबत, बोनस जाहीर करण्यासंदर्भात अधिवेशनामध्ये घोषणा केलेली होती. दिवाळीसारखा सण दिवसवर आला असतांना सुद्धा राज्य शासनाने त्याबाबदची अद्यापही घोषणा न केल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

एकीकडे ‘अलनिनो’ मुळे जिल्ह्यात पर्जन्यवृष्टी ही सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे आणि धान पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव असल्यामुळे धानाचे उत्पन्न हातात कमी येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण हे दुर्दैवाने वाढत आहेत. या आत्महत्यांना राज्य शासनाचे चुकीचे धोरण कारणीभूत ठरत असून जिल्ह्यात अजूनही पूर्ण क्षमतेने शासनाचे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब होत असून जे केंद्र सुरू झालेला आहेत त्या केंद्रावरून शेतकरी बांधवांची खुलेआम लूट होत असतांना जिल्हा प्रशासन आणि पणन विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.

शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज दि. ४ नोव्हेंबर २०२६ बुधवार ला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘जुमलेबाज महायुती सरकार, मुर्दाबाद मुर्दाबाद’, ‘बोनस आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा’, ‘धानाला भाव प्रतिक्विंटल ४ हजार रुपये मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे’, ‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १ लाख रुपये मदत जाहीर करा,’ ‘कर्जमाफीला पंचनाम्याची अट न ठेवता कर्जमाफी सरसकट करा’, ‘शासनाच्या धान खरेदी केंद्रातून शेतकऱ्यांची लूट बंद करा बंद करा’, अशा घोषणांनी मोर्चाने परिसर दणाणून सोडला.

सदर ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ चे नेतृत्व शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय भाऊ रेहपाडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये जिल्हा संघटक लवकुश निर्वाण, जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, युवासेना जिल्हा अधिकारी श्रीकांत मेश्राम, उपजिल्हाप्रमुख किशोर तलमले, किशोर चन्ने, प्रकाश पारधी, विधानसभा संघटक शोभराम तिजारे, तालुकाप्रमुख तिलक सार्वे, दिनेश नंदपुरे, विनोद ढोरे, प्रवीण गायधने, ज्ञानेश्वर बावनकर, तालुका संघटक विनायक सरोदे, भोला शेंडे, शहर प्रमुख राकेश आगरे, अरविंद अंबाडे, गुप्णु राऊत, प्रवीण गुप्ता, प्रशांत देशमुख, मयूर जोशी, भास्कर बेदरकर, मनोज रेहपाडे, योगेश रेहपाडे, शिवचरण टेंभुर्णे, जयदेव जंजाळ, गोपीचंद गोमासे, राजकुमार मोरे, निलेश चामट, नितेश गभणे, चंद्रकांत रेहपाडे, जगन तांडेकर, द्विदेश खडसे, संतोष चांदेलवार, शामराव मालखंडाले, सोमेश्वर सेलोकर, कार्तिक देवगडे, होमराज उपरीकर, सत्यनारायण कामठे, कुंदन धुर्वे, राजीव लांजेवार, गीताराम जीभकाते, देवानंद राऊत, अनिरुद्ध गाढवे, गणेश दोनाडकर, मंगेश प्रधान, रतन केवट, मंगेश मारबते, मनिराम मारबते, निखिल बशिने, अनिल माहुले, राजेश कांबळे, विनायक सरोदे, विशाल भुरे, प्रशांत जोशी, अरविंद अंबाडे, आनंद बाउटाराखये, रफिक शेख, जनार्दन तलमले, अरविंद भुरे, रोहित बनसोड, क्षितिज बावनकर, मयूर सावरकर, सोमेश्वर कोरमोरे, शुभम भुरे, शेखर वाघमारे, मधुकर वाघमारे, किशोर बावणे, विनोद अस्वले, विनायक सरोदे, देवानंद निमजे, हनुमान शेंडे, पितांबर खंडाते, प्रवेश बनसोड, यश पारधी, विश्वजीत पांडाया, मृणाल शामकिवर, संकेत कोसरे, आर्यन बाँद्रे, प्रिंस लांजेवार इत्यादी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमुख मागण्या :- १) मागील वर्षांचा धानाचा बोनस तातडीने मंजूर करून शेतकरी बांधवांच्या खातयात जमा करावा. २) धानाला प्रति क्विंटल किमान ४ हजार रू. भाव द्यावा. ३) शेतकरी बांधवांना केलेली कर्जमाफी ही पंचनाम्याची अट न घालता सरसकट करावी. ४) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १ लाख रुपये मदत जाहीर करा. ५) शासकीय धान खरेदी केंद्रावरून शेतकरी बांधवांकड्यून ४० रू. प्रति बोरा हमानी आकारली जाते ती ताबडतोब बंद करण्यात येवून ओलावा म्हणून प्रति बोरा ४ ते ५ किलो घेतला जातो, त्यावर कार्यवाही व्हावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *