प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे वेधणार लक्ष
दै. लोकजन वृत्तसेवाभंडारा :- महाराष्ट्रा्यातील सार्वजनिक विद्यापीठें व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त कृती समितीतर्फे ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते उच्च शिक्षण संचालक कार्यालय, पुणे येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना त्वरित न्याय मिळावा यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठें व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संयुक्त कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महासंघ वतीने आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष विजयकुमार घरत, महासंघ प्रतिनिधी डॉ. श्याम पंचवटे, रोशन भोयर, विदर्भ संघटनेचे अध्यक्ष दिलीप उपासे, विदर्भ कार्याध्यक्ष महेश कुथे, महासचिव संदीप हिवरकर यांनी दिली. या मोर्चान जिल्ह्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश म्हसे, महासचिव रावसाहेब त्रिभुवन तसेच संयुक्त कृती समितीचे प्रमुख अजय देशमुख यांनी केले आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत आश्वासित योजनेचे १०, २० आणि ३० वर्षांचे तीन लाभ तात्काळ लागू करणे, जुनी पेंशन योजना लागू करणे, विद्यापीठें व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवसांचे काम लागू करणे, प्रयोगशाला व ग्रंथालय परिचरांना सुधारीत ग्रेड पे वेतन लागू करणे, विद्यापीठें व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरने आणि कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. सदर मोर्чала विदर्भातून जास्तीत जास्त कर्मचारी बंधूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी डॉ. श्याम पंचवटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.








