दिवाळीपूर्वीच भंडारा जिल्ह्यात मोठा बदल

आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदला

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- दिवाळी सणापूर्वीच भंडारा जिल्हा पोलीस दलात मोठा बदल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी प्रशासकीय कारणावरून ८ पोलीस अधिकारी/ ठाणेदारांच्या जिल्हांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात बदल्या केल्या आहेत.

बदल झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पाच पोलीस निरीक्षक आणि तीन सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक नीतिन राठोड यांची ठाणेदार, पोलीस स्टेशन आंधळगाव येथून ठाणेदार, पोलीस स्टेशन साकोली येथे बदली झाली आहे. तर साकोलीचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक महादेव आचरकर यांची जिल्हा विशेष शाखा, भंडारा येथे बदली करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत, पोलीस स्टेशन भंडारा येथून ठाणेदार, पोलीस स्टेशन मोहाडी येथे जाणार आहेत. मोहाडीचे ठाणेदार सुरेंद् बेलखेडे यांची ठाणेदार, पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे बदली झाली आहे. जवाहरनगरचे ठाणेदार भिमाजी पाटील यांची पोलीस स्टेशन भंडारा येथे पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, आर्थिक गुन्हे शाखा, भंडारा येथून ठाणेदार, पोलीस स्टेशन आंधळगाव येथे जाणार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि रविंद्र रेवतकर यांची ठाणेदार, पोलीस स्टेशन करडी येथे तर करडीचे ठाणेदार गोरखनाथ नागलोत यांची स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा येथे बदली करण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी या बदल्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *