वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – खा. डॉ. प्रशांत पडोळे
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून कार्य करावे आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन प्रभावीपणे योजना राबवाव्यात,” असे निर्देश खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिले. जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत त्यांनी केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांचा सखोल आढावा घेतला.
बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, आ. नाना पटोले, आ. राजू कारेमोरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, सभापती शितल राऊत, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते तसेच विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. “”आ. नाना पटोले म्हणाले की, भंडारा जिल्ह्यालाशासनाकडून अधिकाधिक निधी मिळावा आणि तो योग्य ठिकाणी वापरला जावा, यासाठी दिशा समितीने समन्वय साधावा. आ. राजू कारेमोरे यांनी “शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणि कृषी योजनांची प्रभावी प्रसिद्धी होणे आवश्यक” असल्याचे मत व्यक्त केले.