आयुध निर्माणी स्फोट प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जवाहरनगर येथील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्शन २३ क्रमांकाच्या इमारतीत दि. २४ जानेवारी रोजी स्फोट झाला होता. यात ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर ४ कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी तपासासाठी पोलिसांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीत जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये सेफ्टी सेक्शनचे विभागीय अधिकारी देवेंद्र रामदास मिना (४९), मेनटनन्स विभागाचे ज्युनीअर वर्क मॅनेजर आदिल रशील फारुकी (४६), सामान्य प्रशासन विभागाचे संजय सुरेश धपाडे (४४), सेक्शन प्रभारी अधिकारी आनंदराव मधुकरराव फाये (५०) व आयुध निर्माण जवाहरनगर व्यवस्थापनातील इतर जबाबदार अधिकारी हे कारणीभूत झाल्याचे निष्पन्न झाले. पो स्टे. जवाहरनगर येथे कलम १०६ (१), १२५ (ब) भा.न्या.स. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

या स्फोटात चंद्रशेखर गोस्वामी, मनोज मेश्राम, अजय नागदेवे, अंकित बारई, लक्ष्मण केलवडे, अभिषेक चौरसिया, धर्मा रंगारी, संजय कारेमोरे या आठ जणांचा मृत्यू झाला होता. नरेंदकुमार प्रल्हाद पंजारी, राजेश देवदास बडवाईक, सुनिलकुमार यादव, जयदीप अजितकुमार बॅनर्जी हे पाच कर्मचारी हे गंभीर जखमी झाले होते.

महिनाभरानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या जयदिप बॅनर्जी यांचा नागपूर रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ माजली. आयुध निर्माण कंपनीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ दुसरीकडे हटविण्यात आले. तर कामगारांनी आंदोलन केले होते. या स्फोटाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशीत आयुध निर्माणी जवाहरनगरचे आरएक्स विभागातील एलटीपीई सेक्शनची ईमारत क्र. २३ मध्ये असलेल्या मशीन व त्यातील उपकरणामध्ये बिघाड होत होता. परंतू सदर मशीनचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

सदर मशीन व उपकरणाची नियमित साफसफाई व देखभाल याकडे दुर्लक्ष केल्याने, निष्काळजीपणामुळे सेक्शन मधील बिल्डींग क्र. २३ मध्ये स्फोट झाला, तसेच प्रशिक्षणार्थी यांना अतिसंवेदनशिल ठिकाण असलेल्या सदर सेक्शन मध्ये कामा करिता पाठविले. त्यामुळे सदर ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या ९ कर्मचारी यांचे मरणास तसेच इतर ४ कर्मचारी यांचे गंभीर जखमी होण्यास आयुध निर्माणी जवाहरनगर, जि. भंडारा चे देवेंद्र रामदास मिना, आदिल रशील फारुकी, संजय सुरेश धपाडे, आनंदराव मधुकरराव फाये व आयुध निर्माणी जवाहरनगर व्यवस्थापनातील इतर जबाबदार अधिकारी हे कारणीभूत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांचे लेखी रिपोर्ट वरुन पो स्टे. जवाहरनगर येथे कलम १०६ (१), १२५ (ब) भा.न्या.स. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा प्रशांत कुलकर्णी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *