सब्जी मंडी च्या जागेला, क्रांतीसुर्य फुलेंचे नाव द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- येथील सब्जी मंडी प्रसिद्ध आहे. या सब्जी मंडी ला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्याची मागणी ओबीसी जनगणना परिषद व अन्याय निवारण संघर्ष समिती यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. भंडाऱ्यातील सब्जी मंडीला महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे असा ठराव नगरपरिषद भंडाराने २०२१ मध्ये केला आहे. चार वर्षे होऊ नये या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. नगरपरिषद भंडाराने सब्जी मंडी ला आज पर्यंत महात्मा ज्योतिबा फुलेंचे नाव दिले नाही. यापूर्वी अनेक निवेदन जिल्हाधिकारी व शासनाला देण्यात आले. परंतु या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही.

एवढेच नाही तर जिल्ह्यातून सब्जी मंडित येणाऱ्याशेतकरी बांधवांनी भंडाऱ्याच्या सब्जी मंडी महात्मा ज्योतिबा फुले नाव द्यावे यासाठी दोन हजार स्वाक्षरी केलेले निवेदन जिल्हाधिकारी व शासनाला धाडण्यात आले. तथापि, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. परिणामतः ओबीसी जनगणना परिषद व अन्याय निवारण संघर्ष समिती आक्रमक झालेली आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव सब्जी मंडी ला देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे निवेदन देण्यात आले. तसेच ओबीसी जनगणना परिषद व अन्याय निवारण संघर्ष समिती यांनी सब्जी मंडी ला महात्मा ज्योतिबा नाव देण्यात यावे यासह भंडारा सब्जी मंडीची जागा शासकीय असल्याने संपूर्ण व्यवस्थापन व सब्जी मंडीचा संपूर्ण कारभार नगर परिषद, भंडारा प्रशासनाने करावा.

शासनाचा बुडीत होत असलेला महसूल नगर परिषद/शासनाकडे जमा करावा. भंडारा सब्जी मंडीमध्ये शेतकऱ्यांची होत असलेली लुट तातडीने थांबविण्यात यावी. शेतकऱ्यांकडून वसुल करण्यात येत असलेले अवैध शुल्क घेणे ताबडतोब बंद करण्यात यावे. ओबीसी वसतीगृहाची शासकीय इमारत तयार करून त्यात सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *