डॉ. चिंतामण खुणे उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- स्थानीय मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साकोली येथील प्राचार्य डॉ. चिंतामण जे. खुणे यांना उत्कृष्ट प्राचार्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार नागपूर येथील धनवटे सायन्स कॉलेज येथे प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र राज्य माहिती सहाय्यता केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या राबविल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट प्राचार्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर करिअर कट्टाचे संचालक यशवंत शितोळे, डॉ. राजमोहन परदेशी, एस. सी. बिदर, मनीष कुमार, प्राचार्य डॉ. शरद तायवडे, विभागीय समन्वयक डॉ. सुजित म्हेत्रे, भंडारा जिल्हा समन्वयक डॉ. संदीप सरय्या, प्राचार्य डॉ. अजय मोहबंशी, प्राचार्य डॉ. सुरेंद्र पवार, डॉ. प्रशांत पगाडे, डॉ. भास्कर पर्वते, गोदावरी गौरकर, मंगेश वागदे, डॉ.मनोज सरोदे, घनश्याम मानकर, डॉ. अनुराधा खाडे, शहारे,डॉ. गणेश कापसे. संजय रायबोले व विद्यार्थी उपस्थित होते.वद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापक वृंदांमध्ये त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे प्राचार्य डॉ. खुणे हे लोकप्रिय आहेत.

इतकेच नव्हे तर त्यांचा सामाजिक उपक्रमातही नेहमीच सहभाग राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या या सामाजिक योगदानामुळे त्यांना मागील वर्षी शामरावबापू कापगते प्रतिष्ठान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्राचार्य डॉक्टर चिंतामण पुणे यांना पुरस्कृत केल्याबद्दल गोंदिया एज्युकेशन संस्थेतफर्फे व मनोहरभाई पटेल महाविद्यालयाचे कर्मचारी ,प्राध्यापक, मित्रमंडळी व विद्यार्थी यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *