पोवार समाजाने आपली संस्कृती जपावी -धनेंद्र तुरकर
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोवार समाजाने आपल्या समाजाची संस्कृती जपावी असे प्रतिपादन भंडारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ व सभापती धनेंद्र तुरकर यांनी काल ५ मार्च रोजी सिहोरा येथे आयोजित क्षत्रिय पोवार समाज गौरव सोहळ्या निमित्त अध्यक्षिय भाषणातून बोलतांनी केले.तत्पूर्वी माता गडकालिका व राजा भोज यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. राजा भोज महोत्सव गौरव सोहळ्याला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार शिशुपाल पटले, ग्रामपंचायत सिहोराचे सरपंच सौ. रंजू तुरकर,जिल्हा परिषद सदस्य सुषर्मा पारधी सिहोरा क्षेत्र, तभाचे उप संपादक रवींद्र तुरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. राजा भोज हे पवार समाजाचे गौरव आहेत.त्यांनी केलेले कार्य हे प्रशंसनीय आहे.
पवार समाजाने राजा भोज यांचे विचार आत्मसात करावे असे प्रतिपादन शिशुपाल पटले यांनी केले.सुषमा पारधी यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.रात्री ८ वा ह.भ.प. नाणीकराम टेंभरे यांचे पोवारी भाषेतील कीर्तनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला नंदु तुरकर, नागोराव तुरकर, वामनराव चौधरी,धनंजय तुरकर,दिनेश बिसने,सुनील कटरे,श्रीराम तुरकर,सहादेव तुरकर,छगन भाऊ पारधी,सुधीर पुंडे,अनिल बघेले,धरम बिसने,दिनेश तुरकर, गोपाल येळे, माणिक ठाकरे, माधोराव तुरकर,टेकचंद तुरकर, माधवराव चौधरी,भाऊलाल पटले,देवशिला बाई तुरकर,निर्मला तुरकर व पोवार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिहोरा व बोरगावच्या पोवार समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन छायाबाई पारधी यांनी तर आभार प्रदर्शन ओमकार चव्हाण यांनी केले.