महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला आघाडी आक्रमक
भंडारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- वाढती महागाई, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे भडकलेले दर आणि सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या वतीने दिनांक २ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला. याच आंदोलनाचा भाग म्हणून भंडारा जिल्ह्यात महिला जिल्हाध्यक्षा सौ. राणीताई ढेंगे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली जिल्हाभरातील आणि तालुकातील युवती संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तीव्र निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी ‘बस हो गई… मंहगाई की मार, नही चाहिये अब ये तानाशाही सरकार!’ अशा जोरदार घोषणा देत केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांचा कडक शब्दांत निषेध नोंदवला.
या आंदोलनात आणि निवेदन देताना महिला जिल्हाध्यक्षा सौ. राणीताई ढेंगे यांच्यासह शाहीन खान, नीलिमा रामटेके, शुभदा झंझड, उर्मिला आगाशे, माळूताई कारेमोरे, उषा रामटेके, लता बावनकुळे, करुणा राऊत, मीना पौनीकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला व युवती आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.
शासनने या मागण्यांकडे त्वरित लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात जनहितार्थ यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सौ. राणीताई ढेंगे यांनी प्रसिद्धी पत्रкана्वारे दिला आहे.








