खुला तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकारामांचं मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
दै. लोकजन वृत्तसेवा मुंबई :- दूध, पनीर, वेगवेगळ्या पदार्थातील मिसळणीनंतर आता तुकाराम मुंडेनी आपला मोर्चा खाद्य तेलाकडे वळवला आहे. आम्ही ‘सेव्ह फूड सेव्ह ड्रग सेव्ह महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत काम करत आहोत. त्याच अनुषंगाने पुढची महत्त्वाची ऑर्डर काढत आहोत. एडिबलं ऑईलबद्दल हा आदेश असल्याचे सांगत आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी खाद्य तेलाचा मुद्दा हाती घेतला आहे. खाद्यतेलाबद्दल जे स्टॅण्डर्ड आहेत, त्याची तपासणी आता केली जाईल, या क्षेत्रामध्ये आता काम केलं जाईल, अशी माहिती मुंडेंनी दिली. तसेच, खाद्य तेलामध्ये स्टॅण्डर्ड तपासणीनंतर भेसळ अनियमितता प्रकारच्या काही गोष्टी सापडल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नोंदणी न केलेल्या काही खाद्य तेल उत्पादक कंपन्या आम्हाला मिळाल्या आहेत, खाद्य तेलाची भेसळ करण्याचा प्रकार आम्हाला मिळाला. मोहरी तेल अनधिकृत मिश्रण केलं जातay, याची परवानगी नाही. मुदत संपलेल्या तेलाच्या परत रिपॅकिंग केल्याचंही निदर्शनास आल्याची माहिती मुंडेंनी पत्रकार परिषदेत दिली. खाद्यतेलाच्या स्टॅण्डर्डसंदर्भनि आपण कपलायन्स ऑर्डर काढत आहोत. खाद्यतेलाच्या संदर्भात काम करणाऱ्या आस्थापनाना विविध मानके नियम लागू होतात. खाद्य तेलाच्या उद्योगात काम करणाऱ्या सर्वांना आदेश लागू असेल. किराणा दुकानदार ऑनलाइन विक्रेते, उत्पादनापासून ते विक्री करणाऱ्या प्रत्येकला आदेश लागू असेल. त्यासाठी, ४९६ सेंट्रल लायन्सन रजिस्टर आहेत, अशी माहिती तुकाराम मुंडेंनी पत्रकार परिषदेतून दिली.








