महिला उद्योजकता केंद्राच्या प्रशिक्षणातून ५७ विद्यार्थिनींना रोजगाराचे संधी
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थिनी आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा उंचावणे तसेच त्यांना स्वावलंबी बनवणे हा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी विद्यार्थिनींनी स्वतःचा व्यवसाय उभारून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे सांगितले. प्रमुख अतिथी स्वाती ढेंगे यांनी विद्यार्थिनींना उत्तम उद्योजिका होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर डॉ. सुनंदा देशपांडे यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी जीवन जगण्याचे महत्त्व पटवून दिले. एकता जाधव यांनी महिलांनी कुटुंबाच्या हिताचा विचार करून व्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन केले.
मेंहदी प्रशिक्षिका सना शेख यांनी विद्यार्थिनींना आवश्यक कौशल्ये शिकवून त्यांना भावी उद्योजिका बनण्यास मदत केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजिका डॉ. स्मिता गजभिये यांच्यासह डॉ. संगीता हाडगे, सारिका माहुरे रूपाली खेडीकर, स्वाती नवले, शितल कोमेजवार, पूजा नवखरे, नेहा हुकरे, अजिंक्य भांडारकर, युवराज जांभुळकर, मिलिंद कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रतिभा वंजारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.