भाजप पवनी शहराची संघटनात्मक बैठक संपन्न

तिरंगा यात्रा, पदवीधर मतदार नोंदणी व आगामी कार्यक्रमांचा आढावा

दै. लोकजन वृत्तसेवा
पवनी :- भारतीय जनता पार्टी पवनी शहराची संघटनात्मक बैठक भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. बैठकीत आगामी हर घर तिरंगा अभियान, १४ ऑगस्ट रोजी आयोजित तिरंगा यात्रा, पदवीधर मतदार नोंदणी, शक्ती केंद्रप्रमुख नियुक्ती, जिल्हा समितीचे नियोजन, दिल्ली आंदोलन, तसेच लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे म्हणाले की, ‘हर घर तिरंगा अभियान’ हे प्रत्येक भारतीयाच्या राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे. प्रत्येक बूथवर, प्रत्येक घरी तिरंगा पोहोचवून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे. आगामी तिरंगा यात्रा, पदवीधर मतदार नोंदणी आणि संघटनात्मक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे.

बैठकीला सोनु बावनकर (उपाध्यक्ष, नगर परिषद), संदीप नंदरधने (शहराध्यक्ष), सुरेश अवसरे गटनेता प्रमुख नगरपरिषद, डॉ. संदीप खंगार, भावना वैद्य, सारिका नंदरधने, हटवार, बिलवणे (नगरसेविका), चंद्रशेखर कळंबे (शहर महामंत्री), दत्तू मुनरतीवार (शहर महामंत्री), रोहित नागपुरे (युवा मोर्चा अध्यक्ष), भास्कर उरकुडकर (नगरसेवक) आणि राजकुमार उरकुडकर (ओबीसी मोर्चा अध्यक्ष) यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत आगामी सर्व संघटनात्मक कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच प्रत्येक शक्तीकेंद्र व बूथ स्तरावर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *