शेतकऱ्यांचे केबल चोरणाऱ्या टोळीला अटक; १.२७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जिल्ह्यातील चार तालुक्यात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींना अटक

दै. लोकजन वृत्तसेवा
लाखनी :- शेतकऱ्यांच्या सोलर पंप व मोटर पंपचे केबल वायर चोरणाऱ्या अंतरजिल्हा टोळीला लाखनी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी या कारवाईत चोरीस गेलेला मुद्देमालासह एकूण १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सविस्तर असे की, दि. ०५ ऑगस्ट रोजी तक्रारदार सौरभ सुरेश दोनोंडे रा. पिंपळगाव/सडक व जागेश्वर वासुदेव येळणे रा. पिंपळगाव/सडक यांनी त्यांच्या शेतातील सोलर पंपचे केबल वायर चोरी गेल्याची तक्रार लाखनी पोलीस ठाण्यात दिली होती. यापूर्वीही लाखनी परिसरात शेतकऱ्यांच्या मोटर पंपचे केबल वायर चोरीच्या तक्रारी प्राप्त झाली होती.

सदर आरोपींनी लाखनीसह पालांदूर, अड्याळ, कारधा, लाखांदूर परिसरातही चोऱ्या केल्याची कबुली दिली. चोरीचा माल त्यांनी आरोपी अतुल सरदारे याला विकला होता. त्याच्या घरून ७९ किलो जळालेला तांब्याचा तार व १८ किलो तांबा किंमत ७३ हजार ६०० रुपये जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या २ मोटरसायकल किंमत ५० हजार रुपये देखील जप्त करण्यात आला. सर्व आरोपींना अटक करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पो.ना. बांते पोलीस स्टेशन लाखनी करीत आहेत. ही कारवाई मा. पोलीस

ठाणेदार पोलीस निरीक्षक आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे यांच्या पथकाने मानेगाव सडक ते पिंपळगाव सडक रोडवर पेट्रोलिंग दरम्यान दोन संशयितांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे प्लास्टिक सोल्लेले वायर, निळे, पिवळे, लाल रंगाचे बारीक वायर मिळून आले. अंगझडतीत कटर व टेस्टर सापडले. चौकशीत त्यांनी पाल धाब्यामागील शेतातील मोटर पंपचे केबल चोरल्याची तसेच इतर ठिकाणी आम्ही चोरी केल्याची कबुली दिली.

संशयीत चार आरोपींना अटक
यात शैलेश धरमराज कोसरकर, वय ३४ वर्षे, रा. राजकुमार वार्ड क्र. ०५, हिंगणा रोड नागपूर, ह.मु. लाखनी, सम्राट रामभाऊ वाघाये वय २१ वर्षे, रा. केसलवाडा वाघ, ज्ञानेश्वर उर्फ टॅगो नरेश मते वय २९ वर्षे, रा. श्रीनगर कॉलनी मुरमाडी/सावरी, चोरीचा माल खरेदी करणारा अतुल भानुदास सरदारे वय ४८ वर्षे, रा. धारगाव यांना अटक करण्यात आली.

अधीक्षक नुरूल हसन भंडारा, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे भंडारा, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे साकोली यांच्या मार्गदर्शनात पो.नि.आशिष गजभिये पोलीस स्टेशन लाखनी, पो.उप. निरिक्षक अतुल तराळे लाखनी व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *