मुलाचा जीव वाचवताना पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे यांच्यावर अस्वलान हल्ला
राजेगाव एमआयडीसी मधील घटना
मुलगा सुखरूप, बागडे यांच्यावर उपचार सुरु
दै. लोकजन वृत्तसेवा
लाखनी :- हरविलेल्या ११ वर्षीय मुलाचा शोध घेत असताना लाखनी पोलिसांच्या पथकावर अस्वलान हल्ला केला. या हल्ल्यात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०६ ऑगस्ट रोजी रात्री भाग्यश्री धर्मेंद्र सुखदेवे, वय ३५ वर्षे, रा. राजेगाव एमआयडीसी यांनी त्यांचा मुलगा दिव्यांश धर्मेंद्र सुखदेवे वय ११ वर्षे हा शाळेतून आल्यानंतर सायकलने मित्रासोबत पटाची दाणीवर गेला असल्याचे तक्रार दिली. वडील मारतील या भितीने त्याने
सायकल तेथेच फेकून नर्सरीकडे पळ काढला होता. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अचल कपूर यांच्या नेतृत्वात पोउपनि देविदास बागडे, पोहवा अमितेश वडेटवार, मपोहवा वच्छला चांचे, पो.शि. पियुष बाच्छल, सचिन बुधे,
पोलिसांचे कौतुक
पोलिसांनी अवघ्या काही तासात हरविलेल्या मुलाचा शोध घेऊन तो आई-वडिलांना सुखरूप परत दिला. मात्र या बचावकार्यात एका पोलीस अधिकाऱ्याला आपल्या जीवाची पर्वा न करता धोक्याला सामोरे जावे लागले. याचे सर्वत्र स्तरावर कौतुक होत आहे.
शुभम फंदे, चापोशि स्वप्नील कहालकर यांचे पथक गावकरी व शासकीय वाहनांसह शोधासाठी रवाना झाले. गावाकऱ्यांच्या मदतीने वेगवेगळी पथके तयार करून गाव,
पोलिस व वनविभागाचे आवाहन
राजेगाव एमआयडीसी व परिसरात जंगल जवळ असल्याने वन्यप्राण्यांचा वावर आहे. रात्रीच्या वेळी एकट्याने जंगल परिसरात न जाण्याचे आवाहन वन विभाग व पोलिसांनी केले आहे.
परिसर व जंगलात शोध घेतल्यानंतर दिव्यांश गावाबाहेर सुखरूप मिळून आला. त्याला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
मुलगा सापडल्यानंतर पथक गडेगाव आगार परिसरात शोध घेत
असताना पोउपनि देविदास बागडे यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेले आशिष विठ्ठल लांडगे वय ३२ वर्षे, रा. गोंडसावरी हे भितीने जंगलाच्या दिशेने पळून गेले. तत्काळ पोलीस पथक व गावकर्यांनी बागडे यांना ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे रेफर करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पथकाने जंगलात जाऊन मोबाईलच्या संपर्काने आशिष लांडगे याला झाडावरून सुखरूप ताब्यात घेतले. त्याला कोणतीही इजा झालेली नाही.








