शेतकरी, मजूर, जनतेच्या हक्कासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशानुसार हे आंदोलन झाले. कार्यकर्त्यांनी विश्रामगृहापासून पायी जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी साहेब यांना भंडारा जिल्ह्यातील नगर परिषद क्षेत्रातील ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, व्यावसायीकांच्या खालील समस्यांचे वर निवेदन देण्यात आले. निवेदन मध्ये खालील मागण्या विशेष रूपाने मांडण्यात आल्या.
दिलेल्या मागण्या तत्काळ पूर्ण करण्यात याव्या अन्यथा भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे तीव्रआंदोलन छेडण्यात येईल असे आव्हाहन मोहन पंचभाई यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, जी. प. अध्यक्ष कविता उईके, जयश्री बोरकर, राजेश हटवार, प्यारेलाल वाघमारे, धनंजय तिरपुडे, देवा इलमे, प्रेम वनवे, गोलू निर्वाण, योगेश झलके, सदानंद धारगावे,सुभाष आजबले, विपीन बोरकर, मोहन निर्वाण, प्रमोद तीतरमारे, अमर रागडे, सुरेश मेश्राम, विजय, सम्मु सेख, पवन वंजारी, मुन्ना भोंगडे, श्रीकांत बांसोड, प्रफुल्ल शेंडे, शंकर तेलमासरे, विकास राऊत, स्वाती वाघाये, पूजा हजारे, योगेश गायधने, अशोक कापगते, संजय सार्वे, मार्कंड भेंडारकर, जीवन भजनकार, लखन चवले, सोमराज गाभणे, विजय चौधरी, शैलेश पाळोडे, बिट्टू सुखदेवे, स्वप्नील भोंगाडे, मनोज बागडे, विजय शहारे, धर्मेंद्र नंदरधने व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.