जंतर-मंतर वरून परतणाऱ्या एआयएसएफ कार्यकर्त्यांचा जल्लोषात स्वागत सत्कार
दै. लोकंजन वृत्तसेवा
भंडारा :- जंतर-मंतर दिल्ली येथील प्रोटेस्ट मध्ये आणि विशेषतः २० जुलै च्या संसद मार्च मध्ये भंडारा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी युवक युवर्तीने सहभाग घेतला होता.
त्या आंदोलनात जिल्ह्यातील एआयएसएफचे अनेक कार्यकर्ते लाठीमाराम्त गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात भरती सुद्धा झाले होते आणि आता आंदोलन यशस्वीरित्या संपन्न झाल्यावर दिनांक २८ जुलै ला भंडाराला परत आल्यानंतर कॉ. वैभव चोपकर व कॉ. आफ़ताब यांचा भंडारा बस स्थानकावर रंग गुलाल उधळून बँड वाज्याच्या गजरात जल्लोषात स्वागत करून इन्कलाब जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, शिक्षा का व्यापार नही चलेगा, लाठी गोली की सरकार नही चलेगी, हर जोर जुल्म की टकर मे संघर्ष हमारा नारा है, धर्मेन्द्र प्रधान तो झांकी है, मोदी-शाह बाकी है. इत्यादी घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली व त्रिमूर्ती चौक भंडारा येथील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
या ठिकाणी जखमी अवस्थेत दिल्लीवरून परत आलेले ऑल इंडिया स्टुडेंट्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ. वैभव चोपकर व कॉ. आफ़ताब यांचा माजी विद्यार्थी नेते व भाकप चे जिल्हा सचिव कॉ. हि्वराज उके व नम्रता नागडे यांच्या हस्ते शाल व गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अनेक विद्यार्थी युवक युवती महिलांची उपस्थिती होती त्यात प्रामुख्याने ए आय एस एफ चे जिल्हा सचिव कॉ. विश्वजीत बनकर, कॉ. जयश्री खांडकुरे, प्रणय बडवाईक,निशिका उरकुडे, खुशी गजभिये, शांतू गभणे, शितल नागदेवे, प्रलया मेश्राम, रोहिणी, प्रिन्स, हर्षल पाटील, करुणा राऊत, शाहीन खान, पायल ठाकुर, श्रद्धा सोनेकर, गजानन पाचे, प्रियनकला मेश्राम, सीमा काळे, राम राऊत, एडव्होकेट क्रांती उके इत्यादींचा समावेश होता.








