तिरोडा तालुक्यातील बिबिटोला येथे आईपासून दुरावलेल्या दोन बिबट पिलांची सुखद पुनर्भेट; वनविभाгаच्या संयमी प्रयत्नांना यश

दै. लोकजन वृत्तसेवा

गोंदिया :- जंगल आणि वन्यजीव यांच्यातील निसर्गरनियमांमध्ये मानवी हस्तक्षेप कमी कमी ठेवत संवेदनशीतने केलेल्या कार्यवाहीमुळे तिरोडा तालुक्यातील बिबिटोला शेत शिवारात आई पासून दुरावलेल्या दोन बिबट पिलांची त्यांच्या मादी आईशी यशस्वी पुनर्भेट घडवून आणण्यात गोंदिया वनविभागाला उल्लेखनीय यश आले आहे. संयम, शास्त्रीय नियोजन आणि सततच्या देखरेखीमुळे घडलेली ही घटना वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने आश्वासक मानली जात आहे.

वनपरिक्षेत्र गोंदिया (प्रादेशिक) अंतर्गत तिरोडा वनक्षेत्रातील मौजा बिबिटोला येथे सोमवारी सकाळी शेतकरी गौरीशंकर रामचंद्र रहांगडाले हे भात रोपांची लागवड करीत असताना त्यांना दोन बिबट पिले आढळली. गावकऱ्यांनी प्रसंगवधान राखत तत्काल वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. भगत, प्रशांत हुमणे तसेच आरआरटी पथक घटनास्थळी दाखल झाले.

सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही पिलांना तात्पुरते ताब्यात घेऊन बोडराणी तपासणी नाक्यावर आणण्यात आले. प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण सोनेवाने यांनी तपासणी करून दोन्ही पिले पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जीवशास्त्रज्ञ नूर अली सय्यद यांच्या मार्गदर्शनखाली पिलांना ज्या ठिकाणी ती आढळली होती त्याच परिसरत पुन्हा सोडण्याचा निर्णय घेतला आला.

या संपूर्ण प्रक्रियेत घटनास्थळी लाईव्ह कॅमेरे आणि ट्रॅप कॅमेरे बसवून वनकर्मचाऱ्यांनी रात्रभर दक्षतेने निरीक्षण ठेवले. अखेर रात्री सुमारे ९.४५ वाजता बिबट मादी घटनास्थळी पोहोचली. काही क्षणांच्या सावध हालचालीनंतर तिने दोन्ही पिलांना आपल्या सोबत घेत जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले. हा क्षण उपस्थित वनकर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरला.

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, अशा घटनांमध्ये पिलांना कृत्रिमरीत्या स्थलांतरित करण्याऐवजी त्यांचा नैसर्गिक अधिवासात पुनर्भेट घडवून आणणे हीच सर्वोत्तम संवर्धन पद्धत मानली जाते. बिबिटोला येथील यशस्वी कार्यवाहीने वनविभाгаच्या वैज्ञानिक दृष्टिकोनासह संवेदनशील कार्यपद्धती आहे.

ही मोहीम उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग व सहायक वनसंरक्षक विजय धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परीक्षेत्रधिकारी प्रशांत हुमणे, आर. एस. भगत तसेच वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणासाठी नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन परीक्षेत्रधिकारी प्रशांत हुमणे यांनी केले आहे. दिल्या जाणार आहेत. भूमिअभिलेख विभागाकडून स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप आणि अवघ्या २०० रूपयांत पोटहिस्सा मोजणी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. कृषी विभागाकडून पीएम किसान सन्मान निधी व पीएमएफएमई योजनांसाठी अर्ज स्वीकारले जातील. महिला व बालविकास विभागामार्फत बाल संगोपन योजना, तर प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी पात्र महिलांची नोंदणी केली जाणार आहे. नगरविकास विभाग शहरी भागातील २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांच्या पट्टा प्रक्रियेवर काम करणार असून, वन विभागाकडून पीक नुकसानाबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशासनाच्या दृष्टीने हे शिबिर केवळ सेवा वितरणापुरते मर्यादित नसून ‘लोकाभिमुख आणि सुलभ प्रशासन’ या संकल्पनेला बळ देणारा उपक्रम मानला जात आहे. एका दिवसात अनेक विभागांच्या सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ, खर्च आणि कार्यालयीन दिरंगाई कमी होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *