भंडारा न. प. च्या कारभाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा

शिवसेना (उ.बा.ठा.)चे जिल्हाधिकारी मार्फत नगर परिषद आयुक्तांना निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- भंडारा नगर परिषद ही आपल्या भोंगळ कारभारासाठी नेहमीच प्रसिद्ध राहिलेली आहे, अशातच सहा महिन्यापूर्वी झालेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत संगणक साहित्य व अन्य बाबींच्या पुरवठा निविदा प्रक्रियेत घोळ करून शासनाला चुना लावण्याचे काम केल्याचा स्पष्ट आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या निवेदनातून करीत आहे.

भंडारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरीता संगणक व अन्य साहित्य पुरवठा करण्याकरीता निविदा मागविण्यात आल्या आणि शहरातील मे. मानव मोबाईल या एजन्सीला साहित्य पुरवठा करण्याचे कंट्राट देण्यात आले. या एजन्सीकडून संगणक, डीव्हीडी रायटर, एलईडी टि.व्ही., प्रिंटर, लॅपटॉप, प्रोजेक्टर सारखे साहित्य निवडणूक प्रक्रियेत पुरविण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर या सर्व साहित्याच्या किराياपोटी जे बिल मे. मानव मोबाईल या एजन्सीला प्रदान करण्यात आले ते मात्र बुचकळ्यात टाकणारे आहे. या सर्व कामासाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालयाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कितीतरी जास्त पतीने दर लावून पुरवठा धारक एजन्सीला देयके प्रदान करण्यात आली.

जेवढे संगणके भाड्याने घेतली होती, तेवढीच संगणके प्रत्यक्षात बाजारातून खरेदी केली असती तरी ती ५ लक्ष रूपये अधिकची झाली नसती. परंतु भंडारा न. प. ने त्यासाठी जवळजवळ १५.५० लक्ष रू. किराया दिला, अर्थात यामध्ये न.प. भंडाराला अंदाजे १०.५० लक्ष रू. फटका बसला. अशाचप्रकारे अन्य साहित्याच्या किरायामध्ये, दरामध्ये स्वतःच्या मर्जीने दर लावून भंडारा न.प. भंडाराला लाखो रूपयाचा चुना लावण्याचे काम न.प. च्या अधिकाऱ्यांनी निवडणूक दरम्यान केलेले असून जिल्हाधिकारी कार्यालयाने ठरवून दिलेल्या दराला केराची टोबली दाखвит आपल्या அதிகாரाचा दुरुपयोग केल्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, शहर प्रमुख राकेश आग्र्रे, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, राजेश ठवकर, प्रकाश गभणे, नितेश गभणे, ताराचंद शिवारकर, अनुप ढोलई इत्यादींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *