करडी पोलिसांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :-करडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेश भाऊदास डोंगरे हे पो.स्टे. परिसरात पेट्रोलिंग करीत होते. मुंढरी (बु) भोयर किराणा दुकानासमोर येथे अवैध रेती चोरटी वाहतुक करतांना स्वराज कंपनीचा बिना नंबरचा ट्रॅक्टर व ट्रॉली नं. एम.एच. ३६- झेड ८१७० दिसला. ट्रक्टर मालक नितेश उर्फ करित अशोक शेंडे (२७) रा. मुंढरी बुज. यांच्या सांगण्यावरून मुंढरी (बु) रेती घाटामधुन चोरीची रेती नेत असल्याचे चालक शंकर लाकडु भोयर (२९) रा. मुंढरी बुज. यांनी सांगितले. ट्रॅक्टर, ट्रॉलीली व रेती असा एकूण ६ लाख ६ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला.वरील कारवाई मा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी, सपोनि सुधीर बोरकुटे, पो. उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *