जि.प.शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा ७ वा टप्पा लवकरच..!!
महायुतीच्या काळात २०१७ मध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदली करण्यात आल्या होत्या. या ऑनलाईन बदल्यांमुळे भ्रष्टाचाराला लागम लागला होता. तर या बदली प्रक्रियामुळे महाराष्ट्र ातील ९९.९९ टक्के शिक्षक समाधानी असल्याचेही निदर्शनास आले होते. मात्र मागील वर्षी या बदल्या होण्यास दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले होते. आंतरजिल्हा बदलीच ऑनलाईन ७ वा टप्प्या संदर्भात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया एप्रिल, मे महिन्यात राबविल जाते. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने ती राबविली नाही.
ही प्रलंबित बदली प्रक्रिया शिक्षक भरती पूर्वी शैक्षणिक वर्ष २०२४-२५अखेरची सेवाजेष्टता लावून तात्काळ ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात यावी, अशी मागणी शिक्षक सहकार संघटना कडून करण्यात आली होती. याबाबत शिक्षक संघटनांनी डॉ. परिणय फुके यांना देखील भेटून यावर तोडगा काढण्याबाबत निवेदन दिले होते. याचीच दखल घेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे साहेबांसमवेत पत्रव्यहार देखील केला होता. या मागणीला यश मिळाले असून ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा लवकरच राबविण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णय ही जाहीर करण्यात आला असून सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या वतीने आमदार डॉ. परिणय फुके यांचे आभार मानण्यात येत आहे.