लाखांदूर पोलिसांकडून जुगार अड्ड्यावर धाड

६० हजाराचा मुद्देमाल जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

दै. लोकजन वृत्तसेवा
लाखांदूर:- लाखांदूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर धाड टाकून ५९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ७ आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन लाखांदूर हद्दीत मौजा लाखांदूर येथे काही इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत असल्याची माहिती सपोनि गंद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता ७ आरोपी जुगार खेळताना रंगेहाथ सापडले.

अटक आरोपींची नावे १) मुकेश देविदास दिवटे (३५) रा. वार्ड नं. १३, लाखांदूर, २) विनोद उर्फ विनय गणपत शहारे (४०) रा. लाखांदूर, ३) सिताराम मोतीराम भागडकर (४५) रा. मांडळ, ४) पंकज विष्णू गुरुणुले (३०) रा. लाखांदूर, ५) मंगेश वसंता माकडे (२७) रा. लाखांदूर, ६) उमेश केशव बगmare (४५) रा. लाखांदूर, ७) दत्ता विठ्ठल मखरे (३९) रा. मांडेड़, सर्व ता. लाखांदूर, जि. भंडारा अशी आहेत.

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम, हिरोहोंडा मोटारसायकल क्र. एम एच ३५ एच ४६३० किंमत ५० हजार असा एकूण ५९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी फिर्यादी सपोनि गंद्रे, पो.स्टे. लाखांदूर यांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक ३१०/२०२६ कलम १२ (अ) म.जु.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पो.नि. भालेराव यांच्या मार्गदर्शनात सपोनि गंद्रे व पोलीस पथकाने केली. पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *