शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

मुकाअ व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर

दै. लोकजन वृत्तसेवा,भंडारा:- आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना जिल्हा भंडाराच्यावतीने भंडारा जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या राज्य व जिल्हास्तरीय विविध मागण्यांना घेऊन दिनांक ९ जून २०२६ ला जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉ. माधवराव बांते, जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके, युनियनचे संघटक कॉ. राजू बडोले यांनी केले.

याप्रसंगी दिलेल्या निवेदनात पटसंख्या चे निकष ठरविताना प्रति २५ विद्यार्थ्यां मागे एक तर २६ विद्यार्थ्यां पासून ९९ विद्यार्थ्यांपर्यंत दोन स्वयंपाकी मदतनीस ठेवण्याचे निकष असून ते अमानवीय आहे त्यात २६ विद्यार्थ्यांपासून ९९ विद्यार्थ्यांपर्यंत दोन असे निकष लावण्यात यावे व ९९ विद्यार्थ्यांपासून १९९ पर्यंत तीन असं निकष लावण्यात यावे व बारा महिन्याचे मानधन, वेतन देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना मानधना ऐवजी वेतन लागू करावे, किमान वेतन दराप्रमाणे किमान २१ हजार रुपये असावे, तसेच शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जुलै २०२४ पासून १ हजार रुपये वाढीचा एरियर्स देण्यात यावे, शापोआ कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युटी व प्राऊंडफंड लागू करावे, शापोआ कर्मचाऱ्यांना शाळा परिचराचा दर्जा व वेतन श्रेणी देण्यात यावे, शैक्षणिक सत्र नेहमीप्रमाणे २६ जून पासून सुरू करण्यात यावे किंवा १५ जून पासून सुरू केल्यास जून महिन्याचे मानधन देण्यात यावे, शापोआ कर्मचाऱ्यांना शासनाने नेमून दिलेल्या आठ कामाव्यतिरिक्त इतर कामे देऊ नये, शापोआ कर्मचाऱ्यांबद्दल कोणतीही कारवाई करण्याआधी त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी, शापोआ कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या चार तासाच्या वेळेपेक्षा जास्त साडे दहा ते पाच वाजेपर्यंत थांबविणे ची सक्ती केली जाते ती बंद करण्यात यावी तसेच शाळा उघडणे व बंद करण्याची सक्ती करू नये तसेच करारनामा लिहिण्याची सक्ती करू नये इत्यादी मागण्यांच्या समावेश करण्यात आला.

वरील मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती निर्मला माधवी नेताजी माने यांना संघटनेच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. शिक्षणाधिकाऱ्यांनी मागण्यावर चर्चा करून शासनाकडे पाठपुरावा करण्याचे व त्यांचे स्तरातील मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात कॉ. शिवकुमार गणवीर, कॉ. हिवराज उके, कॉ. राजू बडोले, कॉ. वृंदा मोहपुरे, इंदू खंडारे, विद्या बोंद्रे आशा दुग्कर इत्यादींचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *