विदर्भ साहित्य संघाचा पदग्रहण सोहळा संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा,भंडारा:- विदर्भ साहित्य संघ शाखा भंडाराच्या वर्ष २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा सार्वजनिक वाचनालय भंडाराच्या इंद्रज सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

या पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे हे होते. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष ॲड. सुधीर गुप्ते, ज्येष्ठ समाजसेवी अमृत बनसोड उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीत निवड झालेले अध्यक्ष प्रा. सुमंत देशपांडे, सचिव डॉ. जयश्री सातोकर, उपाध्यक्ष प्रा. नरेश आंबिलकर, सहसचिव विवेक कापगते, कोषाध्यक्ष कविता कठाने, कार्यक्रम प्रमुख हर्षल, कार्यकारणी सदस्य डॉ. धनंजय गभणे, डॉ. के. एल. देशपांडे, प्रा. नरेंद्र भुरे, डॉ. राहुल भोरे, डॉ. ममता राऊत, डॉ. कविता राजाभोज, मार्गदर्शक धनंजय दलाल, ॲड. सुधीर गुप्ते, अमृत बनसोड, डॉ. दशरथ कापगते, नीलकंठ रणदिवे, प्रा. वामनराव तुरिले यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. सुमंत देशपांडे यांनी विदर्भ साहित्य संघाच्या जुन्या उपक्रमांना नवीन उपक्रमाची जोड देऊन शाखेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी गुप्ते, बनसोड यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणातून डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी विदर्भ साहित्य संघाच्या भंडारा शाखेने उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार यापूर्वी पटकाविला प्रा. देशपांडे यांच्या नेतृत्वात परत हा पुरस्कार प्राप्त करावा अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. आभार डॉ. जयश्री सातोकर यांनी मानले. कार्यक्रमाला अनिता परिहार, किशोर परिहार, ग्रंथपाल घनश्याम कानतोडे, महेश साखरवाडे, दिनेश हरडे, सुधीर खोब्रागडे, युवराज साठवणे, मारुती वाघमारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *