
दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर :- दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा महाशिवरात्रीच्या पर्वावर चुलबंद नदीकिनारी असलेल्या शिवमंदिर येथे महाशिवरात्रीची यात्रा भरली. लाखांदूर येथील चुलबंद नदीकिनारी असलेल्या शिव मंदिरामध्ये असलेल्या आग्या मोहतेलाने शिवभक्तावर हल्ला चढविला. त्यामुळे सर्व शिवभक्त इकडे तिकडे पळायला लागले. त्या मोहतेलाने १८ शिवभक्तावर हल्ला चढविला. लगेच सर्व शिवभक्तांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालय इथे उपचार करता आणण्यात आले. सदर घटना ही दुपारी साडेबारा वाजताची असून दोन वाजेपर्यंत १६ लोकांना प्राथमिक उपचार करून सुट्टी देण्यात आली. परंतु दोन शिवभक्तांना थोडा त्रास असल्याने त्यांना उपचाराकरता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय ठाकरे व वैद्यकीय कर्मचारी त्यांच्यावर उपचार करून सुट्टी दिली.