आठ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर पोलिसांनी मोटारसायकल चोरून ती विक्री करणाऱ्या एकास अटक केली. त्याच्या ताब्यातून आठ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस झाले. भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन तुमसर येथील परिसरातील मागील महिन्यापासुन मोटार सायकल चोरीचे प्रमाणात वाढ होताच पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण शाखा यांना विशेष सुचना दिल्या. वाल्मिकी उर्फ बालु लोकचंद हरिणखेडे वय ४२ वर्ष रा. पाथरी, ता. गोरेवाडा जि. गोंदिया, ह.मु. बिड गणेशपुर, (बुट्टीबोरी) ता.हिंगणा जि. नागपुरयास ताब्यात घेवुन बारकाईने विचारपुस केली. त्याने ०२ फेब्रुवारी २०२५ ला तुमसर परिसरातील एक स्प्लेंडर प्रो. गाडी क्र. एमएच ३६ पी ८०८६ मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले.

आरोपीला अधिक विचारपुस दरम्यान बाकी मोटार सायकल हे दुर्ग, रायपुर (छत्तीसगड) येथुन चोरी करुन त्या गाड्या तुमसर येथे माझे स्वत:ची गाडी आहे, कागदपत्रे नंतर आणुन देतो असे विश्वासात घेऊन तुमसर परिसरात लोकांना विक्री केल्या. गुन्हे प्रगटीकरण शाखा, पोलीस स्टेशन तुमसर पथकाने आरोपी नामे वाल्मिकी उर्फ बालु लोकचंद हरिणखेडे यास ताब्यात घेवुन तुमसर परिसरातील ०१ व ईतर ठिकाणांचे एकुण ०७ मोटारसायकल चोरी केल्याचे कबुल केल्याने आरोपीने विक्री केलेले ०८ मोटार सायकल मुद्देमाल असा एकुण २, लक्ष ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नुरुल हसन व अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी तुमसर पांडुरंग गोफने यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रविण सयाम, हवालदार जयसिंग लिल्हारे, कनोजिया, शिपाई बंडु काचगुंडे, राजकुमार गिरीपुंजे, परिमल मुलकलवार, चा.पो.शि.कोसरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *