भाजपाचे अविनाश ब्राम्हणकर, काँग्रेसचे दिलीप बन्सोड यांच्यासह अपक्षांचे अर्ज दाखल

 भंडारा (दै. लोकजन वृत्तसेवा) :- भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (विधानपरिषद) निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म भरण्याचा आज (दि.१) शेवटचा दिवस होता. भाजपाचे अविनाश आनंदराव ब्राम्हणकर, काँग्रेसचे दिलीप वामन बन्सोड यांच्यासह प्रफुल गोपालदास अग्रवाल, नरेश माणिक ईश्वरकर, अभिषेक जगदिश कारेमोरे, सचिन यशवंत कुंभलकर, भास्कर ओंकार रहांगडाले यांनी आज नामनिर्देशन अर्ज दाखल केले. सात उमेदवारांनी ११ नामनिर्देशनपत्र दाखल केले. तत्पूर्वी महायुतीच्या मतदारांची लक्ष्मी सभागृह भंडारा येथे तर काँग्रेसच्या मतदारांची खा. प्रशांत पडोळे यांच्या कार्यालयात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी पक्षातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून असून १८ जून रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २२ जून रोजी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *