ओबीसींच्या आंदोलनाला संविधान बचाव संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- ओबीसी संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी दिनांक ११ मे २०२६ पासून कलेक्टर कचेरी भंडारा समोर बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू केलेले आहे. त्यात सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळात दिनांक ३० एप्रिल २०२५ ला ओबीसींची जात निहाय जनगणना करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर कायम राहावे तसेच जनगणना २०२७ मधील प्रश्न क्रमांक १२ मध्ये एससी व एसटी प्रमाणे ओबीसींची जनगणना करावी इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.

सदर आंदोलनाला संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडारा तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला व प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेण्यात आला. या आंदोलनालागोसे प्रकल्प संघर्ष समितीने सुद्धा समर्थनपत्र देऊन पाठिंबा जाहीर केला.

याप्रसंगी कॉम्रेड हिवराज उके यांच्या मार्फत लोक वांग्मय प्रकाशनगृह मुंबई यांनी महात्मा फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित केलेले, सत्यशोधक महात्मा फुले विचार जागर अभियान पुस्तिकेचे संच उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच पुस्तिकेचे दहासंच विक्री करण्यात आले. आजच्या या आंदोलनात संविधान बचाव संघर्ष समिती व ओबीसी संघर्ष समितीचे सर्वश्री कॉ. सदानंद इलमे, रोशन जांभुळकर, चंद्रशेखर टेंभुर्णे, कॉ. हिवराज उके, ग्यानचंद जांभुळकर, श्रीकृष्ण पडोळे, अमृत बनसोड, भगीरथ धोटे, भगवान मेश्राम, गजानन पाचे, विष्णुदास जगनाडे, विजयकांत बडगे, अरुण लुटे, प्रभाकर वैरागडे, रोशन उरकुडे, मनीषा भंडारकर, राजेश टेंभुर्णे, भिवगडे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *