मी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय…; बच्चू कडूंचं ठरलं, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश
मुंबई:- महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आज बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मी शेतकरी,मजूर, दिव्यांगासाठी धनुष्यबाण हाती घेणार आहे. काल परवा ज्या चर्चा झाल्या, त्या सर्व शिवसेनेनं मान्य केल्या आहेत.बच्चू कडूचं काम प्रामाणिकपणे राहिल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे. तर प्रहार संघटना आहे तशीच राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.









