ग्रामपंचायत पोट निवडणुकीत गडेगाव येथे सरपंच पदी वर्षा रेहपाडे पुन्हा विजयी
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :-तालुक्यातील गडेगाव येथे सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत वर्षा रेहपाडे यांना ४४५ मत मिळाले. भारती कुथे यांना १७०, लक्ष्मी बडगे २४७, सिंधु कुथे यांना ३२४ व नोटा ला ११ मते मिळाली . वर्षा रेहपाडे यांना सर्वाधिक मते मिळाल्यामुळे सरपंच पदी पुन्हा विराजमान झाल्या. यापूर्वी त्यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. परंतु लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून बहुमताने विजयी केले आहे. लाखनी तालुक्यात ग्रामपंचायत पोट निवडणुकीत गुरढा येथे प्रभाग क्रमांक १ मधून रक्षक राजेश गोंडाने अनुसूचित जाती गटातून सदस्य पदासाठी विजयी झाले आहेत.
निमगाव येथे प्रभाग क्रमांक १ मधून भूपेश देविदास चौधरी सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत. कवलेवाडा ग्रामपंचायत मध्ये प्रभाग क्रमांक २ मधून यादवराव नीलकंठ बडोले अनुसूचित जाती गटातून विजयी झाले आहेत. मुरमाडी (तुपकर येथे प्रभाग क्रमांक २ मधून नमिता राजेश मेश्राम अनुसूचित जाती महिला गटातून सदस्य पदी विजयी झाले आहेत. विजय उमेदवाराचे गावामध्ये विजय मिरवणूक काढण्यात आली आहे. तहसीलदार शितल घावटे व नायब तहसीलदार धर्मेंद्र कुमार उरकुडकर यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी पार पडली.









