राजनंदन गाव येथील झाकी रामनवमी शोभायात्रा ची शोभा वाढविणार

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रामनवमी थाटामाटात तुमसर शहरात साजरी करण्यात येत आहे यात शोभा यात्रेमध्ये राजनांदगाव येथील विविध प्रकारच्या झाक्या तुमसर करांचे लक्ष वेधणार यावेळी बोलताना पत्रकार परिषद मध्ये श्रीराम जन्मोत्सव रामनवमी नवयुवक समिती यांनी माहिती दिली.

तुमसर शहरात रामनवमी हा उत्सव हर्ष उल्हास पद्धतीने साजरा करण्यात येते राम जन्मोत्सव नवयुवक समिती ने दि. २४ मार्चला पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या २६ मार्चला तुमसर शहरात रामनवमी निमित्य विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेयात सकाळी दहा वाजता बाईक रॅली राजाराम लॉंन येथून संपूर्ण नगर भ्रमण करीत दुपारला बारा वाजता श्रीराम मंदिर येथे समापन होणार त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मातोश्री सभागृह इथून श्रीराम प्रभूची आरती अर्चना करून शोभायात्रेला सुरुवात होईल हिशोबा यात्रा संपूर्ण तुमसर शहरातील नगर भ्रमण करीत गणेश मंदिर येथे समापन करण्यात येईल. या शोभायात्रेमध्ये राजनंदगाव येथून कलकी. पाणीवाला शंकरजी, महाकाल, बजरंग बली, भोले की बारात, नरेंद्रचार्य महाराज यांची पालखी, साईबाबा, गजानन महाराज, व जगन्नाथ पुरीच्या रथ असे विविध झाक्या शोभायात्रा मध्ये सहभागी होणार आहेत. तरी नागरिकांनी शोभायात्रा निघेल तेव्हा घरासमोर रांगोळी व दिवे लावून स्वागत करण्याचे आव्हान रामनवमी नवयुवक समिती तर्फे करण्यात आले आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी महाप्रसाद व पाणी व शरबत वितरणाचे स्टॉल सुद्धा लावण्यात येणार आहे. सुरक्षा करिता पोलिसांच्या चूक बंदोबस्त असून नागरिकांनी सहयोग करण्याचे सुद्धा आवाहन केले आहे. पत्रकार परिषद श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा नवयुवक समितीचे अध्यक्ष आनंद रोचवाणी, सचिव शेखर मलेवार मन्नू धुर्वे, अमरीश सानेकर, विनायक शर्मा, संजय थोटे, संजू खंडेलवाल अमित कुंजेकर विकी भोंडेकर, अज्जू शिरसागर, आस्वलेजी व कृपानजी हो इतरही राम भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *