अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- लाखनी पोलिसांनी नाकाबंदी करून गोवंश जनावरांची वाहतूक करीत असलेल्या ट्रक पकडला. त्यातून १३ गोवंशीय जनावरांचे सुटका करण्यात आली तर ११ लाख ४५ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक २४ मार्च २०१६ चे पहाटेचे सुमारास अवैध्य जनावरे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने ओमकार सेलिब्रेशन हॉल लाखनी समोर पोलीस स्टेशन लाखनी येथील पोलीस उपनिरीक्षक सुदाम कांबळे पोलीस नाईक श्रीकांत वाघाये, पोलीस शिपाई भूपेश हटवार यांनी नाकाबंदी केली असता सकाळी ०५:३० वाजता सुमारास ट्रक क्रमांक एम. एच. ३४ एबी ९७८२ यास थांबवून ट्रकची पाहणी केली असता ट्रकचे मागील भागात २३ गोवंश जातीचे जनावरे चारापाण्याची व्यवस्था न करता दाटीवाटीने दोरीचे साह्याने बांधलेले दिसून आले.
त्यापैकी एक जनावर मरण पावले होते ट्रकचालक शितल सिंग रामलखन राठोड व (४२ वर्ष) राहणार विनोबा भावे नगर नागपूर यास त्याचे ट्रक मधील जनावरे वाहतुकीचे परवाना बाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिल्याने पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा कारवाई करून मिळून आलेले गोवंश जातीचे जनावरे ध्यान फाउंडेशन गराडा येथे दाखल करण्यात आले.
आरोपी ट्रक चालक शितलसिंग राम लखन राठोड (वय ४२) राहणार विनोबा भावे नगर नागपूर यांचे विरुद्ध कलम ५ (ए), (बी), ९ (ए) महा प्राणी संरक्षण अधिनियम २००५ सह कलम ११ (१)(डी), (ए)(ई)(एफ) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा सह कलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ सह कलम ३२५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून एकूण ११ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास पोलिस हवालदार प्रतीक बरोबर हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली शिवम विसापुरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस उपनिरीक्षक सुदाम कांबळे, पोलीस नाईक श्रीकांत वाघाये, पोलीस शिपाई भूपेश हटवार, चालक पोलीस शिपाई राजेश पटले यांनी केलेली आहे.









