सभापती ईश्वरकर यांच्या आंदोलनाला अनेक संघटनांचा पाठिंबा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत ८७८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याचा ठराव सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात यावा या मागणीसाठी जि. प. शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांनी दि. १० मार्चपासून जिल्हा परिषदसमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला अनेक संघटनांची पाठिंबा दिला आहे. तर जिल्हा काँग्रेस व संरपंच संघटनांच्यावतीने उद्या दि. १७ मार्च रोजी मोर्चा काढण्ाार आहेत. विशेष म्हणजे आज जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी स्वमर्जीने आंदोलन स्थळी आले होते. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ओबीसी संघर्ष समितीच्यावतीनेही या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळा ७६१ व हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय ३२ आहेत. यात मध्यम व गरीब कुटूंबातील ७० हजाराच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ नुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. सद्यास्थितीत विविध संवर्गातील ८७६ शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये८७६ शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी मंजुरी देवून तशी घोषणा करावी अन्यथा असा इशारा जि. प. शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून करण्यात आला होता. मात्र, अर्धे अधिवेशन संपल्यानंतरही त्या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने जिल्हा पदाधिकारी व सदस्य यांनी साखळी उपोषण सुरु केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *