तुमसर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- तुमसर तालुक्यात मनरेगा अंतर्गत पूर्ण झालेल्या कामावर जवळपास १५ कोटी रुपयाचे कुशल कामांचे देयक पाईपलाईन मध्ये आहे. या देयकासाठी निधी ज्या क्रमाने दिले पाठवली गेले असतील त्या क्रमाने उपलब्ध करून द्यावा, जनावरांचे गोठे, वैयक्तिक सिंचन विहिरी, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम ही कामे सुरु करण्याची परवानगी मिळावी व झालेल्या कामाची निधी जमा करण्यात यावी या मागण्यांसाठी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले आहे.

येथील आंदोलनाला स्वराज्य युवा एकता फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पाठिंबा दिला आहे. तुमसर तालुक्यात डिसेंबर २०२४ पूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली सिमेंट रस्ता नाली बांधकाम यासारख्या कुशल अधिक असणाऱ्या कामांना सुरुवात करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही. तरी यावर्षी निर्मित मनुष्य दिनाच्या प्रमाणात आवश्यकते प्रमाणे प्राधान्य क्रमाने ही कामे सुरु करण्याबाबत सूचना व्हाव्यात. तालुक्यात शेतकऱ्यांकडून विहिरींची मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु तालुक्यात सिंचन विहिरींची प्रशासकीय मान्यता देत असताना अकुशल कुशल प्रमाण असल्यामुळे या विहिरी सुरू करता येत नाहीत. कारण त्या कुशल अधिक असणाऱ्या प्रकारात येतात. म्हणून कुशल अधिक प्रमाणात असणाऱ्या विहिरींना मान्यता देण्यात येत नाही. तसेच तालुक्यामध्ये जनावरांच्या गोठ्यांची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.

या कामांमध्ये सुद्धा अकुशल पेक्षा कुशल प्रमाण जास्त असल्यामुळे मान्यता देता येत नाही. तरी तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांमार्फत होणाऱ्या मागणीमुळे आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अकुशल कामे होत असल्यामुळे यावर्षी निर्माण केलेल्या मनुष्य दिनाच्या प्रमाणात कुशल अधिक असणारे कामांना मान्यता देण्यास परवानगी मिळावी.यासाठी परसवाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच पवन खवास यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनोज चौबे, उपसरपंच श्याम नागपुरे, हेमंत बांते, रामदास बडवाईक, मंगेश मानापुरे, सरपंच पंकज पारधी, धनराज आगाशे, नरेंद्र शेंडे, संजय बडवाईक, राजेंद्र ठाकूर, संजय झंझाड, फुकटु हिंगे, दिनेश उचीबघेले, उपसरपंच सलाम शेख, विजय चौधरी, देवा भगत, दीपक लूटे, गौरव पंचबुद्धे, काका भोयर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *