गॅस दरवाढ व टंचाई तसेच शेतकरी, शेतमजुर यांचे प्रश्नावर काँग्रेसचे निदर्शने

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गॅस दरवाढ कमी करून नियमित पुरवठा करणे व शेतकरी शेतमजुर यांचे विविध प्रश्नांना घेवून भंडारा जिल्हा काँग्रेसचेवतीने आज निदर्शने करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी सावनकुमार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, महागाईने सर्वत्तामान्य जनतेचे जगने कठिण झाले असतांना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एल.पी.जी. गॅसच्या किमती वाढवुन लुट करित आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या असताना सुध्दा सबसिडी देवुन महानाईचे चटके बसु दिले नाही. त्याकाळात घरगुती सिलेंडर ४०० रू होता आता १००० रू. आहे,व्यवसायिक सिलेंडर २००० रू. वर गेला आहे.

बुकिंग कालावधी १५ दिवसांवरून ३० दिवसांवर गेला आहे. गॅस तुटवट्यामुळे हॉटेल, खानावळी, मेस इ. बंद पडल्यामुळे बाहेर शिकणारे विद्यार्थी, नोकरदार यांची जेवनाची अडचन निर्माण झाली आहे. तसेच यावर काम करणारे कारागीर, मजुर बेरोजगार झाले आहेत. तरी गॅस दरवाढ कमि करून नियमित पुरवठा करण्यात यावा. शेतकऱ्यांची शासकिय धान खरेदी केंद्रावरील निम्म्या धानाची नोंदणी झालेली नाही. तसेच २ महिण्यापासुन नोंदणी झालेल्या धानाचे चुकारे मिळाले नाहीत व निवडणुकीपुर्वी बोनस देण्याचे सुध्दा आश्वासन दिले होते. तरी रखडलेली धान खरेदी तात्काळ सुरू करून प्रलंबित धानाचे चुकारे व बोनस तात्काळ देण्यात यावे. शासनाने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीत ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे.

सप्टेंबर २०२५ ची अट रद्द करून संपुर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यात यावा. कृषी पंपांना ८ तास वीज धोरण असताना ४ तास विज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी धानपीक, मका, कुस. भाजीपाला पिकवणे अडचणिचे होत आहे. तरी कृषी पंपांना १२ तास विज देण्यात यावी.साखर कारखान्यांकडे १ वर्षापासुन शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकीत आहेत, त्यांना नियमीत देण्यात यावे. मजुरांसाठी महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमीची कामे सुरू करून देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी भंडारा जिल्हा काँग्रसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, शहर अध्यक्ष धनराज साठवणे, प्रदेश सचिव जिया पटेल, प्यारेलाल वाघमारे, रमेश पारधी, कंचन कटरे, प्रमोद कटरे, राजेश हटवार, मनोज देशमुख, गजानन झंझाड, पवन मस्के, लखन चवरे, प्रेम वनवे, विजय शहारे, सौ. स्वाती वाघाये, सौ. गायत्री वाघमारे, सौ. अनिता एकनाथ भुरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *