उमरझरी येथे जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने दोन रानगव्यांचा मृत्यू
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा ःवन्यप्राण्यांपासून शेतपिकाचे नुकसान होवू नये म्हणून शेतकऱ्यांने सोडलेल्या जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होवून दोन रानगव्यांची मृत्यू झाला. ही घटना दि. १२ मार्च रोजी लाखनी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र उमरझरी, नियतक्षेत्र वलमाझरी येथे खाजगी क्षेत्र गट क्रमांक ३८८ मध्ये घडली. कुमार आनंदराव बन्सोड या शेतकऱ्याला वनविभागाने अटक केली आहे.
साकोली येथील वनसंरक्षक (रोहयो, संरक्षण व अतिक्रमण निमुर्लन) संजय मेंढे, लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय व उमरझरीचे बिटरक्षक घटनास्थळी पोहोचले. मृत वन्यप्राणी शरीराचे पशुवैद्यकिय अधिकारी यांचेकडून शवविच्छेदन करण्यात येवुन घटनास्थळ परिसरात शोध घेतला. शेतपिकाच्या संरक्षणासाठी आरोपी शेतमालक कुमार आनंदराब बन्सोड यांनी जिवंत विद्युत प्रवाह सोडला होता. आरोपीच्या शेतातुन करंट लावण्यासाठी वापरण्यात आलेले लाकडे खुंट्या व तार सेंटीग तार जप्त करण्यात आले आहे.






