पवनी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता मॅरेथॉन

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- येथे नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांकरिता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील सर्वच वयोगटातील बहुसंख्य महिलांनी आपला सहभाग नोंदविला. महिलांना प्रोत्साहीत करून त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी नगर परिषद पवनी यांचे वतीने शहरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा तीन गटात म्हणजेच २० ते ४० वर्षे वय, ४० ते ६० वर्षे व ६० ते पुढे असे तीन गट घेण्यात आली.

या स्पर्धेत विजयी महिलेला रोख बक्षीस, प्रमाणपत्र व मोमेंटम देण्यात आले. यामध्ये २० ते २५ वयोगटात करिष्मा गोकुलदास काटेखाये यांनी प्रथम तर द्वितीय बक्षीस योगिता सोमेश्वर मुंडले, तृतीय बक्षीस भूमिका मारोती राऊत यांनी पटकावले. दुसऱ्या ४० ते ६० वयोगटात प्रथम बक्षीस सोनू अजय गायकवाड, द्वितीय संगीता रामू भोगे, तृतीय बक्षीस लता धर्मेंद्र केवट यांना बक्षीस पटकवण्यात यश आले.

तिसऱ्या ६० ते पुढे या वयोगटात प्रथम बक्षीस रश्मी रमेश कहू, द्वितीय बक्षीस स्नेहल देवानंद मोटघरे, तृतीय बक्षीस नर्मदा लोमेश सूर्यवंशी यांनी पटकावले. मॅरेथॉन स्पर्धे दरम्यान नगराध्यक्ष डॉ विजया नंदूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली नागदेव, उपाध्यक्ष सोनू बावनकर, नगरसेवक सुरेश अवसरे, भाष्कर उरकुडकर, शानु बेग, नगरसेविका भाग्यश्री गोमासे, सोनू पंचभाई, भीमा बावनकर, निकिता मेश्राम, दुर्गा हटवार, सारिका नंदरधने, बिलवणे, वंदना नंदागवळी, भावना भाजीपाले, शिवसेना शहर प्रमुख किशोर पंचभाई, विकास सरोदे, प्रतीक कहू, रुपेश कोरेकर यांचेसह नगर परिषद कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *