दोन ठिकाणी गौमांस विक्रेत्यांवर कारवाई
पंचासमक्ष त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे पराचे मधल्या खोलीत इसम गौ मास कापतांना मिळुन आला. घराच्या मागे जावुन पाहणी केली महिला तसेच घराचे मागे टिनाच्या शेड खाली एक पांढऱ्या रंगाचा गोरा दोराने बांधलेला आढळला. त्याठिकाणी सचिन बंसता गोस्वामी, दिलीप उर्फ कपबशी ईश्वर, भाऊदास भिवाजी सोनवाने व अशोक अजर्ुन सोनवाने मिळाले. सुजित सोनवाने याच्या घरातून ३ लक्ष २१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर मोहशीन मुमताज कुरेशी, मुजंबीर उर्फ नावेद मुमताज कुरेशी व मोबीन अहमद कुरेशी तिन्ही रा. सिव्हील वार्ड साकोली हे एल. आय. सी. कार्यालयाचे मागे सिव्हील वार्ड साकोली येथे असलेल्या एका टिनाचे झोपडीमध्ये ८.१५ वा. गेलो असता एक पांढऱ्या रंगाची गाय किंमत १० हजार रुपये ज्याचे चारही पाय दोराने बांधुन त्याला खाली पाडुन एक इसम आपले हातात लोखंडी धारधार सुरी घेवुन गायीचे मानेवर सुरी ठेवुन कापण्याचे तयारीत दिसला. आणखी दोन इसम हे गायीला पकडुन बसलेले दिसले.
त्यांच्या ताब्यातून ४८ हजार १५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चारही आरोपींवर पोलीस स्टेशन साकोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, सहा. पोलीस निरीक्षक दिपक नामदेव वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तरवार, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र चापले, पोलीस शिपाई सचिन राऊत यांनी केली.